• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

फवारणी ड्रोन, कृषी यंत्र - अवजारे प्रमुख आकर्षण

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
November 20, 2025
in Uncategorized, कृषी, जिल्हा, महाराष्ट्र
जळगावात उद्यापासून अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य live डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी) – कृषी विस्ताराच्या कार्यात गेल्या 11 वर्षांपासून प्रभावीपणे कार्य करणार्‍या अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे शहरातील एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज येथे २१ ते २४ नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात नवतंत्रज्ञान, हायटेक फार्मिंग शेतमजुरीला पर्याय ठरतील, असे ड्रोन व लहान-मोठे शेती यंत्र व औजारांवर भर दिला आहे. या आधुनिक कृषी प्रदर्शनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अ‍ॅग्रोवर्ल्डचे संस्थापक शैलेंद्र चव्हाण यांनी केले आहे.

 

अ‍ॅग्रोवर्ल्डच्या या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात 210 पेक्षा अधिक स्टॉल्स आहेत. शेतकऱ्यांना उपयुक्त ठरतील अशा लहान मोठ्या कृषी यंत्र व औजारांचे तब्बल 45 स्टॉल्स आहेत. बदलते हवामान, मजूर टंचाई, अद्ययावत तंत्रज्ञान, करार शेती, कमी पाण्यात येणारी पिके अशा शेतकर्‍यांची मागणी व गरजेवर आधारित मांडणी हे या प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे. अ‍ॅग्रोवर्ल्डचे जळगावतील यंदाचे हे 11 वे प्रदर्शन आहे.

 

जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड, अँग्रिसर्च इं. प्रा.लि., मेट्रोजेन बायोटेक प्रा. लि या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषीतंत्र, निर्मल सिड्स, नमो बायोप्लांटस, सातपुडा अँटोमोबाईल्स, श्रीराम ठिबक, राईज एन शाईन बायोटेक प्रा लि, कृषिदूत बायो हर्बल, ओम गायत्री नर्सरी, युनिटी एनर्जी प्रा लि, पॅक युनिव्हर्स, महाविरा झेरॉन, फायटोट्रॉन, गोदावरी फाऊंडेशन हे सहप्रायोजक आहेत.

 

*प्रदर्शनाची वैशिष्ट्ये*

शेतमजूर समस्येच्या पर्यायावर भर, विविध पिकांतील कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, हाय व्हील्स चाकासह कृषी यंत्र व औजारांचे उपयुक्त स्टॉल्स, शेती बरोबरच परसबाग / टेरेस गार्डन साठीची रोप (नर्सरी ), फळे व भाजीपसल्याच्या नर्सरी, सोलर फार्मिंग, झटका मशीन, फवारणसाठी ड्रोन, बँक, शासकीय विभाग व अनुदानाबाबत एकाच छताखाली माहिती उपलब्ध असेल. टिशूकल्चर केळीच्या कंपन्या, किचन गार्डन टूल्स, कमी पाण्यात, कमी श्रमात व हमीचे उत्पन्न देणारे अद्ययावत तंत्रज्ञान सखोल मार्गदर्शन, कमी श्रमात – कमी पाण्यात मात्र शाश्वत उत्पादन देणार्‍या अपारंपरिक पिकांचेही स्टॉल्स एकाच छताखाली असणार आहेत. प्रदर्शनस्थळी शेतीविषयक विविध पुस्तके देखील विक्रीसाठी उपलब्ध राहतील.

 

 

निर्मलतर्फे मोफत बियाणे

निर्मल सिडसतर्फे पहिल्याच दिवशी पहिल्या पाच हजार जणांना किचन गार्डन बियाणे पाकीट मोफत वितरित केले जाणार आहे. याव्यतिरिक्त रोज शंभरपेक्षाही अधिक जणांना लकी ड्रॉ द्वारे आकर्षक बक्षीसांसह सिका ई- मोटर्सतर्फे ई-स्कूटरचे बंपर बक्षीस जिंकण्याची संधी आहे. तरी शेतकर्‍यांनी या आधुनिक कृषी यंत्र व अवजारे प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

“ज्ञानेश्वरी पारायण ही अध्यात्मिक परंपरेची अमूल्य देण !

Next Post

जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड  

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड   

जामनेर नगराध्यक्षपदी साधना महाजन यांची बिनविरोध निवड  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif