• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home आरोग्य

ॲक्सॉन ब्रेन हॉस्पीटल मध्ये मेंदूतील रक्तवाहिनीच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया  यशस्वी

डॉ. निलेश किनगे आणि त्यांच्या टीमने;  आचेगाव येथील गृहिणीला दिले जीवनदान.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 1, 2025
in आरोग्य, जळगाव
ॲक्सॉन ब्रेन हॉस्पीटल मध्ये मेंदूतील रक्तवाहिनीच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया  यशस्वी
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव – ॲक्सॉन ब्रेन हॉस्पीटल येथे डॉ. निलेश किनगे आणि त्यांच्या टीमने मेंदूतील रक्तवाहिनीच्या गुंतागुंतीच्या यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करून भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथील गृहिणी अलका रवींद्र भोळे यांना जीवनदान दिले आहे.

 

अलका रवींद्र भोळे यांना गेल्या एका महिन्यापासून डाव्या डोळ्याची पापणी पडून दिसायला त्रास होत होता. त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला, परंतु त्यांच्या आजाराचे अचूक निदान होऊ शकले नाही. अखेरीस त्यांना ॲक्सॉन ब्रेन हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आले. तपासणीदरम्यान, त्यांच्या डोक्यातील रक्तवाहिन्यांचा असामान्य फुगा फुटून रक्तस्त्राव झाल्याचे गंभीर निदान झाले.

 

डॉ. निलेश किनगे यांनी तत्काळ मेंदूची अँजिओग्राफी केली, ज्यामध्ये डोक्याच्या डाव्या धमनीत मोठा फुगा असल्याचे स्पष्ट झाले. या फुग्याची ‘मान’ मोठी असल्याने, डॉ. किनगे यांनी फ्लो डायव्हर्टर स्टेंट टाकण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी सिल्क व्हिस्टा हा ब्लास्ट कंपनीचा मेड इन जर्मनी स्टेंट वापरून फुगा पूर्णपणे बंद केला. यासाठी त्यांना भूलतज्ञ डॉ. विनोद किनगे, रेडिओलॉजिस्ट डॉ. वैजयंती किनगे, न्यूरोसर्जन डॉ. संजीव हूजुरबाजार यांचे सहकार्य लाभले.

 

अशा प्रकारच्या गुंतागुंतीच्या मेंदूच्या शस्त्रक्रिया पूर्वी पुणे-मुंबईसारख्या महानगरांमध्येच शक्य होत्या. मात्र, गेल्या १० वर्षांपासून जळगावातील ॲक्सॉन ब्रेन हॉस्पीटलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदू संबंधित आजारांचे अचूक निदान आणि यशस्वी उपचार होत असल्याचे डॉक्टर किनगे यांनी सांगितले.

 

ॲक्सॉन ब्रेन हॉस्पीटल मेंदू संबंधित सर्व प्रकारच्या आजारांचे निदान व उपचारांसाठी एक विश्वसनीय रुग्णालय म्हणून ओळखले जात आहे.

बातमी शेअर करा !
Previous Post

सायबर सुरक्षा व नशामुक्तीवर नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान

Next Post

महात्मा गांधीजींनी नावीन्यतेचा पुरस्कार केला, आपणही करू या – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद     

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महात्मा गांधीजींनी नावीन्यतेचा पुरस्कार केला, आपणही करू या – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद     

महात्मा गांधीजींनी नावीन्यतेचा पुरस्कार केला, आपणही करू या - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद     

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif