• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home अपघात

भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत आई- मुलगा ठार तर पतीसह लहान मुलगा गंभीर जखमी !

विदगाव पुलावरील घटना, कार नदीत कोसळली, घटनास्थळीवाहतूक कोंडी!

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 1, 2025
in अपघात, जळगाव ग्रामीण
भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत आई- मुलगा ठार तर पतीसह लहान मुलगा गंभीर जखमी !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव  : जळगावहून भरधाव वेगाने चोपड्याकडे जाणाऱ्या वाळूच्या भरलेल्या डंपरने समोरून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. तालुक्यातील विदगाव येथील तापी नदीच्या पुलावर मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील आई व मोठा मुलगा जागीच ठार झाला असून पती व लहान मुलगा हे गंभीर जखमी झाले आहेत. शासकीय रुग्णालयात नातेवाईकांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

अपघातानंतर चारचाकी वाहन थेट तापी नदीपात्रात कोसळले. हे चारचाकी वाहन जळगाव शहरातील विठ्ठल नगर येथील शिक्षक निलेश प्रभाकर चौधरी (वय ३६) यांचे होते. चौधरी परिवार चोपडा येथे देवीच्या दर्शनाकरिता गेला होता आणि परतीच्या प्रवासात विदगाव पुलावर त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघातात निलेश चौधरी आणि त्यांचा धाकटा मुलगा ध्रुव निलेश चौधरी (वय ४) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, निलेश चौधरी यांच्या पत्नी मीनाक्षी निलेश चौधरी (वय ३३) आणि मोठा मुलगा पार्थ निलेश चौधरी (वय १२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. निलेश चौधरी हे धानोरा येथील एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.तर मयत मीनाक्षी चौधरी या शिवाजीनगर मधील पाटणकर शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

या अपघातानंतर वाळूने भरलेला डंपर पुलावर आडवा पडल्यामुळे दोन्ही बाजूंनी येणारी-जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. चोपड्याकडून जळगावकडे येणारी तसेच जळगावहून चोपड्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेमुळे जळगाव शहरात शोककळा पसरली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठ्या प्रमाणात आक्रोश करीत शोक व्यक्त केला. जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली व जखमींना उपचारासाठी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवले.

बातमी शेअर करा !
Previous Post

जैन इरिगेशनचे येत्या वर्षात १००० कोटींचे निर्यातीचे उद्दीष्ट – अनिल जैन

Next Post

सायबर सुरक्षा व नशामुक्तीवर नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
सायबर सुरक्षा व नशामुक्तीवर नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान

सायबर सुरक्षा व नशामुक्तीवर नूतन मराठा महाविद्यालयात व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif