• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

मुक्ताईनगर तालुक्यात १५ गावांमध्ये पुराचे थैमान, तरुण वाहून गेला !

लहान-मोठ्या नाल्यांना पूर आल्याने पाणी शिरले गावांमध्ये, शेतीचे मोठे नुकसान 

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 16, 2025
in Uncategorized, आपत्ती, जिल्हा
मुक्ताईनगर तालुक्यात १५ गावांमध्ये पुराचे थैमान, तरुण वाहून गेला !
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर : तालुक्यात मंगळवारी सकाळी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. सकाळी ७ ते १० या तीन तासांच्या मुसळधार पावसाने गोरक्षगंगा नदीच्या काठावरील सुमारे पंधरा गावांना पुराचा मोठा फटका बसला. अनेक लहान-मोठ्या नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी गावांमध्ये शिरले. पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसून जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. कुऱ्हा येथील बाजारपेठेतही पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. या अचानक आलेल्या पावसाने शेतीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान केले असून, अनेक शेतजमिनी खरडून गेल्या आहेत.

 

या नैसर्गिक आपत्तीत एक दुर्दैवी घटना घडली आहे. काकोडा येथील २७ वर्षीय किरण मधुकर सावळे हा युवक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्याचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे यांनी तात्काळ कुऱ्हा गावाकडे धाव घेतली. मात्र, धामणगाव-देशकुंडा जवळील नाल्याला पूर आल्याने त्यांचाही मार्ग थांबला आणि ते तिथेच अडकून पडले. प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, परंतु सततच्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. या पावसाने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

मुक्ताईनगर तालुक्यातील कुन्हा व जोधनखेडा गावात घरांमध्ये पाणी शिरले असून पूर परिस्थिती आहे. काकोडा गावातील किरण मधुकर सावळे (वय २८) हे दुर्दैवाने पुराच्या पाण्यात वाहून गेले. संबंधीत तालुक्यांचे प्रांताधिकारी, तहसीलदार, महसूल व कृषी खात्याचे अधिकारी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करत आहेत. बाधित कुटुंबांसाठी तातडीने अन्न, पिण्याचे पाणी व बिछायतची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने सांगितले की, आपत्तीग्रस्तांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी शांतता व संयम बाळगून प्रशासनाशी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांसह, जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

 

बातमी शेअर करा !
Previous Post

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या 

Next Post

जिल्ह्यात पावसाचा अहाकार ; शेतीसह पशुधनाचे नुकसान

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जिल्ह्यात पावसाचा अहाकार ; शेतीसह पशुधनाचे नुकसान

जिल्ह्यात पावसाचा अहाकार ; शेतीसह पशुधनाचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif