• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

कारमध्ये फिरणाऱ्या चौघांकडून २ गावठी पिस्तूल, १० काडतुसे जप्त 

जळगाव शहरात गेंदालाल मिल येथे शहर पोलिसांची कारवाई

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
September 12, 2025
in क्राईम, जळगाव
कारमध्ये फिरणाऱ्या चौघांकडून २ गावठी पिस्तूल, १० काडतुसे जप्त 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात अवैध शस्त्रे बाळगून फिरणाऱ्या एका टोळीचा शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईत चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २ गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतुसे, १ मॅगझिन आणि १ कार असा एकूण १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई दि. ११ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा करण्यात आली.

 

पोलीस कॉन्स्टेबल प्रणय सुरेश पवार आपल्या पथकासह रात्री गस्त घालत होते. त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. गेंदालाल मिल परिसरात एका कारमध्ये काही संशयित व्यक्ती अवैध शस्त्रे घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. याची गंभीर दखल घेत त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार, पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि सापळा रचला. पोलिसांनी घटनास्थळी संशयास्पद कार थांबवून चौकशी केली. सुरुवातीला आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

 

मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी जवळ गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगल्याची कबुली दिली. या कारवाईत युनुस उर्फ सद्दाम सलीम पटेल (वय ३३), निजामोद्दीन शेख (वय ३१), शोएब अब्दुल सईद शेख (वय २९) आणि सौहिल शेख उर्फ दया सीआयडी (वय २९) या चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एकूण २ पिस्तूल, १० जिवंत काडतुसे, एक मॅगझिन आणि एक कार असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे.

 

 

बातमी शेअर करा !
Previous Post

मू. जे. महाविद्यालात युवती सभेचे उद्घाटन

Next Post

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची खुर्ची सर्वसाधारण गटासाठी राखीव

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची खुर्ची सर्वसाधारण गटासाठी राखीव

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची खुर्ची सर्वसाधारण गटासाठी राखीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 4, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पाळधी बायपास अपघातप्रकरणी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

September 1, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif