• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रीडा

दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल…

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 6, 2025
in क्रीडा, जळगाव
दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल…
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

दिल्लीचा अरिहत कपिल सातव्या फेरीपर्यंत अव्वल…

 

राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील खेळाडूंच्या पालकांशी निशा जैन यांचा संवाद; दुसऱ्या सत्राचे ऐश्वर्या रेड्डी यांच्याहस्ते सुरवात

 

जळगाव दि. ६ प्रतिनिधी* – जैन हिल्सच्या अनुभूती मंडपम येथे सुरु असलेल्या ३८ राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा सातव्या फेरीपर्यंत अटितटीत आली आहे. दिल्लीचा अरिहत कपिल याने पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत सात पैकी सात सामने जिंकून मुलांमध्ये अव्वल स्थानावर आघाडी घेतली आहे. अरिहत कपिल ने महाराष्ट्राच्या अविरत चौहान याला धक्कादायक पद्धतीने नमविले. त्यामुळे त्याला एकल बढत घेता आली. दुसऱ्या पटावर तेलंगणाचा इशान कंदी व पश्चिम बंगालचा नरेंद्र अग्रवाल यांच्यात बरोबरीत सामना झाला. महाराष्ट्राच्या अद्वित अग्रवाल याने ओणीक्षूक मंडल यांच्यामध्ये बरोबरीत सामना झाला.

 

*मुलींच्या गटात सहा गुणांसह सात खेळाडूंचे वर्चस्व…*

 

३९२ मुलं व १७७ मुलींचा समावेश असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या गटात पहिल्या बुद्धिबळ पटावर दिवी बिजेस आणि जानकी एस डी दोघं केरळ यांच्या अटितटीचा सामना होऊन बरोबरीत झाला. झारखंडची दिशीता डे हिने आरध्या दास त्रिपूरा हिच्यासोबतचा सामना बरोबरीत झाला. महाराष्ट्राची क्रिषा जैन व भूमिका बांधले यांच्यात तिसऱ्या पटावर सामना रंगला त्यात क्रिषा जैनने बाजी मारली. सुमिता पुनगावन तेलंगणा हिने मान्या ड्रोलिया गुजरात हिला नमवून आपले वर्चस्व कायम ठेवले. महाराष्ट्राची प्रिशा घोलप हिने कर्नाटकची नक्षत्रा गोमूदवेली हिला नमविले. मुलींच्या गटात सहा गुणांसह सात खेळाडू आघाडीवर आहेत.

 

आजच्या सकाळच्या सत्रात अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांनी सांगितले की, तुम्ही विविध ठिकाणांवरुन येथे आला आहात. खेळताना विजय आणि पराभवाचा विचार करु नका. खेळाचा पुरेपुरे आनंद घ्या. फक्त खेळताना आपले शंभर टक्के योगदान द्या. असा खेळाडूंशी संवाद साधला. यानंतर पालकांशी व्यवस्थेविषयी चर्चा केली. राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेनिमित्त करण्यात आलेल्या व्यवस्थेविषयी पालकांनी समाधान व्यक्त करीत जैन हिल्सच्या निसर्गरम्य परिसराचे कौतूक केले. यानंतर पालकांनी अनुभूती स्कूल ला सुद्धा भेट दिली.

 

दुपारचे सत्र ऐश्वर्या रेड्डी यांच्या प्रमूख उपस्थितीत सुरू करण्यात आले, यावेळी बौद्धिक एकाग्रता वाढविण्यासाठी बुद्धिबळ खेळ खूप मोलाचा असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे मिडीया व्हाईस प्रेसिडेंट अनिल जोशी, नाशिकचे वरिष्ठ प्रशिक्षक सुनील शर्मा, पंच दीपक चौहान, पुण्याच्या जुईली कुलकर्णी उपस्थित होते.

_DSC4705-4849) जैन हिल्स येथे ३८ व्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंच्या पालकांसमवेत चर्चा करताना अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन तर दुसऱ्या छायाचित्रात दुपार सत्राचे उद्घाटन करताना ऐश्वर्या रेड्डी, सोबत जुईली कुलकर्णी, प्रविण ठाकरे, दीपक चौहान

बातमी शेअर करा !
Previous Post

संत ज्ञानेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांनी बियांपासुन तयार केल्या पर्यावरणपुरक राख्या

Next Post

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

जैन इरिगेशनला ‘टाइम्स ऑफ इंडिया इकोप्रेन्योर सन्मान’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!

शेळगाव बॅरेजमध्ये मासेमारीसाठी गेलेला नशिराबादचा तरुण वाहून गेला!

September 6, 2026
युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार!

युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार!

September 6, 2026
गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif