नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव,- मृदंग इंडिया या जाहिरात संस्थेचे संचालक अनंत भोळे यांच्या पत्नी सौ. ज्योती अनंत भोळे (वय ४९) यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनाने भोळे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अंत्ययात्रा आज शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून, भागीरथ कॉलनी, जळगाव येथून नेरी नाका वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कारासाठी निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि भोळे कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो,
नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क हे त्यांच्या दुःखात सहभागी आहे.






