नवराज्य Live न्यूज नेटवर्क
जळगाव : येथील विश्वेश मुलांचे हॉस्पिटलचे संचालक डॉ. विश्वेश विश्वनाथ खडके यांच्या मातोश्री उषा विश्वनाथ खडके यांचे शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी २:१५ वाजता दुःखद निधन झाले. त्या जळगाव शहरातील विश्वेश मुलांचे हॉस्पिटल, सहयोग क्रिटिकलच्या समोर, कोर्टच्या मागील परिसरात वास्तव्यास होत्या.
उषा खडके यांच्या निधनाने खडके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, मुली व जावई असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिचितांनी खडके कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या. कुटुंबीयांच्या दुःखात सर्व स्तरातून सहभागी होत उषा खडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.








