• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जिल्हा दूध संघात १३ रोजी शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन!

संस्थापक दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचेही होणार लोकार्पण: मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील मंत्री संजय सावकारे राहणार उपस्थित.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 12, 2026
in जळगाव, उद्घाटन
जिल्हा दूध संघात १३ रोजी शेतकरी प्रशिक्षण केंद्रासह सांडपाणी प्रकल्पाचे उद्घाटन!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव-  जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, जळगाव तर्फे गुरुवारी, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दूध संघाच्या प्रांगणात विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांचे लोकार्पण व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून दूध संघाचे संस्थापक चेअरमन व माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या स्मारकाचे मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण लोकार्पण करण्यात येणार आहे.याचबरोबर शेतकरी प्रशिक्षण केंद्राची नूतनीकरण झालेली इमारत तसेच मुख्य दुग्धशाळेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे आधुनिकीकरण आणि वाढीव क्षमता प्रकल्पाचे उद्घाटनही याप्रसंगी पार पडणार आहे.

राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीशभाऊ महाजन हे उद्घाटन करणार आहेत तर प्रमुख पाहुणे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आहेत. अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा चाळीसगावचे आ. मंगेश चव्हाण हे आहेत.या सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, राज्यसभा खा. ॲड. उज्ज्वल निकम, खा. स्मिताताई वाघ तसेच विधान परिषदेचे आ. नंदकिशोर महाजन, आ. राजूमामा भोळे, आ. अनिल पाटील, आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, आ. किशोर पाटील, आ.अमोल जावळे, आ. चंद्रकांत पाटील आणि आ. अमोल चिमणराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या सर्व महत्त्वपूर्ण विकासकामांच्या लोकार्पण व उद्घाटन प्रसंगी दूध संघाच्या सर्व सभासदांनी व सदस्यांनी गुरुवारी, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संघाच्या प्रांगणात वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे चेअरमन आमदार मंगेश चव्हाण आणि कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी केले आहे

बातमी शेअर करा !
Tags: गिरीश महाजनजळगाव जिल्हा दूध संघदादासाहेब जे. टी. महाजनदादासाहेब महाजन स्मारकशेतकरी प्रशिक्षण केंद्रसांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
Previous Post

शिक्षणाचे स्वप्न उराशी बाळगून मोठे व्हा*— जलसंपदा मंत्री ना. गिरीष महाजन

Next Post

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif