• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

महापौर-आयुक्तांच्या पुढाकारातून जळगावमध्ये हरित क्रांतीची सुरुवात!

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते टी. एम. नगर येथून मोहिमेचे उद्घाटन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
August 10, 2026
in जळगाव, पर्यावरण
महापौर-आयुक्तांच्या पुढाकारातून जळगावमध्ये हरित क्रांतीची सुरुवात!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित महाराष्ट्र संकल्पनेखाली जळगाव शहर अधिक हिरवेगार, सुंदर आणि प्रदूषणमुक्त करण्याच्या दृष्टीने जळगाव शहर महानगरपालिका आणि ‘महिला हाउसिंग ट्रस्ट’ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात ‘मियावाकी’ वृक्षारोपण व नक्षत्र उद्यान मोहीम राबवण्यात येत आहे. महापौर दीपमाला काळे आणि मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्या पुढाकारातून साकार झालेल्या या मोहिमेचा शुभारंभ आज, १० ऑगस्ट रोजी सकाळपासून शहरातील विविध प्रभागांमध्ये मोठ्या उत्साहात झाला. या मोहिमेचे उद्घाटन शहरातील टी. एम. नगर परिसरात राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते झाड लावून करण्यात आले.

पर्यावरण संवर्धनासाठी लोकचळवळ आवश्यक – ना.गिरीशभाऊ महाजन

वृक्षारोपण प्रसंगी बोलताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये ‘मियावाकी’सारख्या घनदाट जंगल निर्मितीच्या आधुनिक पद्धती अत्यंत प्रभावी ठरत आहेत. केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे जतन आणि संगोपन करणे ही काळाची गरज आहे. जळगाव शहराला हरित व समृद्ध बनवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही या मोहिमेत हिरिरीने सहभागी व्हावे.”

जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले विचार मांडताना सांगितले, “झाडे ही आपली भावी पिढीसाठीची खरी संपत्ती आहे. वाढत्या प्रदूषणावर मात करण्यासाठी आणि शहराचे निसर्ग सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी महापालिकेचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमामुळे जळगावच्या पर्यावरणात सकारात्मक आणि मोठा बदल दिसून येईल.”

कार्यक्रम प्रसंगी बोलताना महापौर दीपमाला काळे म्हणाल्या, जळगाव शहराचे निसर्ग सौंदर्य जपण्यासाठी आणि महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक उपक्रम राबवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महिला हाउसिंग ट्रस्टच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेली ही ‘मियावाकी’ वृक्षारोपण मोहीम जळगावला हिरवेगार आणि आरोग्यदायी बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.”

या प्रसंगी शहराचे आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, वनविभागाचे सनदी अधिकारी सौरीश सहाय, मनपा आयुक्त आदित्य जीवने, वन अधिकारी महेश झांजुर्णे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच या कार्यक्रमास शहरातील विविध प्रभागांतील नगरसेवक, मनपा अधिकारी, कर्मचारी, महिला हाउसिंग ट्रस्टच्या प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या या मोहिमेमुळे जळगावकरांमध्ये पर्यावरणाविषयी एक नवा उत्साह पाहायला मिळत आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव बातम्याजळगाव महानगरपालिकानक्षत्र उद्यानमियावाकी जंगलमियावाकी वृक्षारोपणहरित जळगाव
Previous Post

डॉ. केतकी पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Next Post

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर चार ठिकाणी उड्डाणपूल होणार!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर चार ठिकाणी उड्डाणपूल होणार!

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर चार ठिकाणी उड्डाणपूल होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif