• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

खासदार स्मिताताई वाघ यांचे विजयी करण्याचे आवाहन

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 17, 2026
in जळगाव, Uncategorized, राजकारण
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक २०२६ चे महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर भागवत महाजन यांनी जळगाव शहर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक रणनीती आणि जनहिताच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीला खा. स्मिताताई वाघ, आ. राजूमामा भोळे, आ. मंगेश चव्हाण, भाजपचे पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि उपमहापौर मनोज चौधरी यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेत्यांचे महत्त्वपूर्ण आवाहन आणि ग्वाही : खासदार स्मिताताई वाघ

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी पूर्ण ताकदीने सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी “स्थानिक स्वराज्य संस्थेतील जनहिताचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी विधान परिषदेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न करेन,” अशी ग्वाही त्यांनी शिवसेना नगरसेवकांना दिली.

शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले की, नंदकिशोर महाजन हे विकासाचे स्पष्ट व्हिजन असणारे नेतृत्व आहे. त्यांना जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊन आपण सर्वांनी निवडून आणूया, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सदिच्छा भेटीमुळे महायुतीमधील समन्वय अधिक मजबूत झाला असून, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव मनपातील राजकीय वातावरण चांगलेच महायुतीमय झाले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जळगावनंदकिशोरमहाजनभाजपमहायुतीविधानपरिषदनिवडणूकशिवसेना
Previous Post

रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा

Next Post

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा

रणांगणात अनिल चौधरी ‘डार्क हॉर्स’ ठरण्याची चर्चा

June 17, 2026
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

June 17, 2026

जळगावकरांसाठी दिलासादायक सुविधा;

June 17, 2026

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

June 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif