• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

जळगावकरांसाठी दिलासादायक सुविधा;

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सागर काकतकर यांची नियमित ऑर्थोपेडिक ओपीडी आता जळगावमध्ये

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 17, 2026
in जळगाव, आरोग्य
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव : दिनांक, १६, उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना त्यांच्या शहरातच अत्याधुनिक आणि तज्ज्ञ अस्थिरोग सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिकतर्फे जळगाव येथे नवीन ऑर्थोपेडिक परिघीय ओपीडी (Peripheral OPD) सुरू करण्यात येत आहे. या ओपीडीचे उद्घाटन आणि पत्रकार परिषद दि. १६ जून रोजी पियुष हॉस्पिटल, रिंग रोड, जळगाव येथे संपन्न झाली.

या नव्या उपक्रमांतर्गत डॉ. सागर काकतकर, वरिष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ (Orthopedic Surgeon), अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक हे दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी दुपारी १२.०० ते ३.०० या वेळेत जळगाव येथे रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. या ओपीडीच्या माध्यमातून हाडांचे विकार, सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखी, खांद्याचे आजार, कूल्हा व गुडघा प्रत्यारोपण (Joint Replacement), क्रीडाजन्य दुखापती तसेच विविध अस्थिरोगांवरील आधुनिक उपचारांविषयी रुग्णांना तज्ज्ञ सल्ला मिळणार आहे.

यावेळी बोलताना डॉ. सागर काकतकर म्हणाले, “आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे सांधे व हाडांशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहे. अनेक रुग्ण वेदना सहन करत राहतात किंवा योग्य उपचार घेण्यास उशीर करतात. मात्र योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यास अनेक गंभीर समस्या टाळता येऊ शकतात. जळगाव आणि परिसरातील रुग्णांना तज्ज्ञ सेवा मिळण्यासाठी नाशिकपर्यंत वारंवार प्रवास करावा लागू नये, यासाठी ही ओपीडी सुरू करण्यात आली आहे.” ते पुढे म्हणाले की, “अत्याधुनिक तंत्रज्ञान, मिनिमली इन्वेसिव्ह सर्जरी आणि सांधे प्रत्यारोपण क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. योग्य रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळाल्यास त्यांचे जीवनमान लक्षणीयरीत्या सुधारू शकते. या ओपीडीच्या माध्यमातून जळगाव आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार अस्थिरोग सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये डॉ. काकतकर यांनी आधुनिक अस्थिरोग उपचारपद्धती, सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, क्रीडाजन्य दुखापतींचे उपचार तसेच रुग्णांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर माहिती दिली.

या प्रसंगी डॉ. काकतकर यांच्यावर यशस्वी उपचार घेतलेल्या एका रुग्णाने आपला अनुभव उपस्थितांसमोर मांडला. उपचारानंतर झालेली आरोग्य सुधारणा, वेदनामुक्त जीवन आणि पुन्हा दैनंदिन कामकाज सुरळीत सुरू झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच डॉ. काकतकर आणि अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख श्री. अनुप त्रिपाठी यांनी सांगितले की,

“अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नेहमीच रुग्णांपर्यंत तज्ज्ञ आरोग्यसेवा पोहोचवण्यावर भर देत आले आहे. जळगाव येथे सुरू होणारी ही ऑर्थोपेडिक परिघीय ओपीडी त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. डॉ. सागर काकतकर यांच्यासारख्या अनुभवी अस्थिरोग तज्ज्ञांची सेवा आता जळगावकरांना स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. भविष्यातही उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना अधिकाधिक सुपरस्पेशालिटी सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

याप्रसंगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार बांधव तसेच जळगाव शहरातील नागरिकांची उपस्थिती लाभली.

ओपीडी तपशील

स्थळ : पियुष हॉस्पिटल, रिंग रोड, जळगाव

प्रत्येक महिन्याचा तिसरा गुरुवार

वेळ : दुपारी १२.०० ते ३.००

संपर्क : महेंद्र मोरे – ९६६५८ ८६८८५.

 

बातमी शेअर करा !
Tags: अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलअस्थिरोग तज्ञ जळगावगुडघेदुखी उपचारजळगाव ऑर्थोपेडिक ओपीडीडॉ सागर काकतकरनाशिक मेडिकव्हर हॉस्पिटल
Previous Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

Next Post

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

नंदकिशोर महाजन यांच्या विजयासाठी नशिराबाद येथे भेटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif