• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव

माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत कोट्यवधींचा आर्थिक अपहार उघड!

श्रीकृष्ण संस्थेत ४.८५ कोटींचा घोटाळा; लेखापालाविरोधात गुन्हा, तपास वेगात

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
June 17, 2026
in जळगाव, क्राईम
माजी मंत्री गुलाबराव देवकरांच्या संस्थेत कोट्यवधींचा आर्थिक अपहार उघड!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव :शहरातील श्रीकृष्ण शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या संस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संस्थेच्या लेखापालाविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, तब्बल ४ कोटी ८५ लाख रुपयांहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या या संस्थेच्या शिरसोली रोडवरील महाविद्यालयात लोकेश उर्फ चेतन गणेश कोल्हे (रा. नशिराबाद) हा लेखापाल म्हणून काम पाहत होता. १ ऑगस्ट २०२० ते ३१ मे २०२३ या कालावधीत विद्यार्थ्यांकडून जमा झालेले शुल्क तसेच संस्थेच्या नावे आलेले विविध धनादेश अधिकृत बँक खात्यात जमा न करता त्यांचा परस्पर वापर केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करताना मोठी तफावत आढळून आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला होता. या तक्रारीच्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली.

तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचे समोर आल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अधिकृत फिर्याद दाखल करण्यात आली असून, लेखापालाविरोधात अपहार, विश्वासघात आणि आर्थिक फसवणुकीसंदर्भातील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक बबन आव्हाड व सहायक पोलिस निरीक्षक गणेश फड यांनी महाविद्यालय परिसराला भेट देत संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. तपासासाठी आवश्यक असलेले आर्थिक व्यवहारांचे रेकॉर्ड, पावत्या आणि दस्तऐवज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी आर्थिक व्यवहार समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एमआयडीसी पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बातमी शेअर करा !
Tags: 4.85 कोटी अपहारआर्थिक गैरव्यवहारएमआयडीसी पोलिसगुलाबराव देवकरजळगावश्रीकृष्ण संस्था
Previous Post

विधानपरिषद निवडणूक २०२६ : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा गाठीभेटींवर भर

Next Post

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

जळगाव जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

महाराष्ट्रात भाजप रुजविणाऱ्यांमध्ये प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांचे योगदान महत्त्वाचे – शरद पवार

August 30, 2026
खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

खाऊ गल्लीतील हॉकर्सच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; मनपा प्रशासनाकडून तोडगा काढण्याचे आश्वासन

August 30, 2026
शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 30, 2026
रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

रुपेश पाटील यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण; कुटुंबीयांना पाच लाखांचा विमा धनादेश

August 28, 2026
टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

टाकरखेडा येथील कुटुंबातील चौघांची रेल्वे खाली आत्महत्या

August 27, 2026
धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसानभरपाई!

August 27, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif