• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्रिकेट स्पर्धा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स, चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर विजयी

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
April 23, 2026
in क्रिकेट स्पर्धा, जळगाव
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव दि.22 (प्रतिनिधी):जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रीकल्स सहप्रायोजकत्वाखाली जळगाव क्रिकेट लिग लिग-२०२६, JCL T-20 मध्ये उपांत्यफेरीत पोहचण्याठी चुरस निर्माण झाली आहे. बुधवारी सकाळी रावेर रॉयल्स आणि पाचोरा एसकेटी योद्धाज यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात रावेरचा संघ विजयी झाला. दुसऱ्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्स संघाने दणदणीत विजय मिळवला. तत्पूर्वी २१ रोजी झालेल्या तिसऱ्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने विजय मिळवला.

अमळनेर सुहांस जायंट्स आणि चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स यांच्यातील सामना रोमहर्षक झाला. चाळीसगाव संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. अमळनेर संघाची सुरूवात दमदार झाली. सलामीच्या जोडीने ४९ धावांची भागेदारी केली. मानव टिबरेवाल याने ३९ तर ऋषी यादव याने १० धावा केल्या. मधल्या फळीत आलेल्या अजय पाटील याने जोरदार फटकेबाजी केली. त्याने २७ चेंडूत ३४ धावा केल्या. त्यानंतर आलेले खेळाडू प्रभाव पाडू शकले नाही. परंतु सतीश चतुर्वेदी याने ११ चेंडूत २० धावा केल्या. त्यामुळे अमळनेर संघाची धावसंख्या आठ गडी गमावून निर्धारित २० षटकांत १४७ झाली. चाळीसगावकडून ओम मुंडे याने चार षटकांत केवळ १३ धावांत तीन महत्वाचे बळी टिपले. अमेय कोळी, कार्तिक बटुंगा, अभी पाटील, सूरज पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

त्यानंतर अमळनेरच्या गोलंदजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्सचे फलंदाज टिकाव धरू शकले नाही. अपवाद फक्त ओम मुंडे याचा राहिला. त्याने ३२ धावा केल्या. चाळीसगावचा संपूर्ण संघ १६.३ षटकांत ८४ धावांवर बाद झाला. त्यामुळे अमळनेरचा ६३ धावांनी विजय झाला. चाळीसगाव संघाच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना बाद करणारा मोहम्मद सैफ सामनावीर ठरला.

रोमहर्षक सामन्यात रावेरचा पाहिला विजय

पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या रावेर रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करत १९.२ षटकांत सर्व गडी गमावून १३० धावा केल्या. रावेरच्या संघात सलमावीर यश नहार याने २१ चेंडूत ३१ धावा केल्या. आदित्य वाणी याने ११, तुषार चोरडियाने २०, मोहम्मद नमीन याने २७, धवल हेमानी याने १२, प्रज्वल राजपूत याने २२ धावांची खेळी केल्यामुळे रावेरचा संघ १०० पार जाऊ शकला. पाचोराकडून कैलास पांडे आणि विरेन पाटील यांनी २-२ तर सचिन चौधरी आणि निलेश पाटील यांनी एक-एक बळी घेतला. १३१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात आलेल्या पाचोरा संघ 19.3 षटकांत 123 धावांवर गारद झाला. त्यामुळे रावेरचा सात धावांनी विजय झाला. आर्यन देशमुखने अवघ्या 10 चेंडूत 24 धावांची आक्रमक खेळी करत डावाला वेग दिला, तर सिद्धेश देशमुख (22) आणि विरेंद्र पाटील (20) यांनी मधल्या फळीत योगदान दिले. पण त्यांची खेळी संघाला यश मिळवून देऊ शकली नाही. रावेरकडून यश नहार आणि मोहम्मद नोमान यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धवल हेमदानी, अक्षय कोल्हे, कृष्णा माळी यांनी एक-एक बळी घेतला. तीन बळी, ३१ धावा आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करणाऱ्या यश नहार याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरचा दणदणीत विजय

२१ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर संघाने पाचोरा एसकेटी योद्धाजवर सहा गडी राखून सहज विजय मिळवला. नाणेफेक ॲडिशनल एसपी संदीपकुमार गावित व सामना अधिकारी विनीत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी अभंग अजित जैन यांनी संदीपकुमार गावित यांचा सत्कार केला. प्रथम फलंदाजी करताना पाचोरा योद्धाजने २० षटकांत ९ गडी गमावून १०५ धावा केल्या. वीरेन पाटील (२९), रोहित तलरेजा (२५) आणि सचिन चौधरी (१४) धावांचे योगदान दिले. चाळीसगावकडून अभी पाटीलने ३ बळी घेतले, तर प्रणव जाधव व कोळी यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. १०६ धावांचे लक्ष्य चाळीसगाव संघाने केवळ १३.५ षटकांत पूर्ण केले. प्रशांत डोळे (३७), साहिल गायकर (२९) आणि कर्णधार ओम मुंडे (२४) यांनी दमदार फलंदाजी केली. यामुळे चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने सामना सहज जिंकला.

आज क्वालीफायर ठरणार

जेसीएलमधील साखळी फेरीचे आता दोन सामने बाकी आहे. त्यामुळे २३ एप्रिल रोजी क्वालीफायर ठरणार आहे. गुणतालिकेत जामनेर सातपुडा हिरोज, जळगाव कोगटा किंग सहा- सहा गुण घेत अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहे.

आजचे सामने (२३ एप्रिल)

दुपारी ३ वाजता: रावेर रॉयल्स विरुद्ध X चाळीसगाव एसपीसीसी चॅलेन्जर्स.

सायंकाळी ७.३० वाजता: पाचोरा एसकेटी योद्धाज X अमळनेर सुहांस जायंट्स.

गुणतालिका

संघ

सामने

विजयी

पराभूत

गुण

जामनेर सातपुडा हिरोज

4

3

1

6

जळगाव कोगटा किंग

4

3

1

6

अमळनेर सुहांस जायंट्स

4

2

2

4

चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंन्जर्स

4

2

2

4

पाचोरा एसकेटी योद्धाज

4

1

3

2

रावेर रॉयल्स

4

1

3

2

रात्री ८ पर्यंत

बातमी शेअर करा !
Tags: JCL T20अमळनेर सुहांस जायंट्सचाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरजळगाव क्रिकेट असोसिएशनजळगाव क्रिकेट लीगरावेर रॉयल्स
Previous Post

मेहरूण स्मशानभूमीचा चेहरामोहरा बदलणार; महापौरांनी दिली प्रत्यक्ष भेट

Next Post

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील आता उत्तर महाराष्ट्राचे नेतृत्व करणार

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026

मेहरूण स्मशानभूमीचा चेहरामोहरा बदलणार; महापौरांनी दिली प्रत्यक्ष भेट

April 22, 2026
अटलांटा कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार; 41 कोटींचा अपहार केल्याचा आरोप!

अटलांटा कंपनीविरुद्ध फसवणुकीची तक्रार; 41 कोटींचा अपहार केल्याचा आरोप!

April 22, 2026
पिंप्राळ्यात सव्वा लाखांचा गुटखा जप्त; एक जण अटकेत

पिंप्राळ्यात सव्वा लाखांचा गुटखा जप्त; एक जण अटकेत

April 22, 2026
महाराष्ट्र भाजपची नवी जबाबदारी जाहीर; नाशिकचे लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्ते, गोविंद बोरसे माध्यम प्रमुखघोषणा

महाराष्ट्र भाजपची नवी जबाबदारी जाहीर; नाशिकचे लक्ष्मण सावजी, अजित चव्हाण प्रवक्ते, गोविंद बोरसे माध्यम प्रमुखघोषणा

April 21, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif