• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home क्राईम

दोन मुलांना वाचवताना युवकसह महिलेचा बुडून मृत्यू!

भडगाव शहरात शोककळा : नातेवाईकांचा आक्रोश.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
March 8, 2026
in क्राईम, जिल्हा, ब्रेकिंग
दोन मुलांना वाचवताना युवकसह महिलेचा बुडून मृत्यू!
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

भडगाव (वा.) :शहरातील गिरणा नदी पात्रात दोन लहान मुलांना वाचवताना एका युवकासह महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. ८) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आझाद चौक ते पेठ भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाजवळ घडली. या दुर्दैवी घटनेमुळे भडगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा नदी पात्रातील डोहाजवळ दोन लहान मुले पाण्याच्या कडेला खेळत असताना अचानक त्यांचा पाय घसरून ती पाण्यात पडली. त्यावेळी जवळच भांडी धुण्यासाठी आलेल्या काफिया शरीफ पिंजारी (वय १६) यांनी हे दृश्य पाहताच मुलांना वाचवण्यासाठी तत्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याची खोली जास्त असल्याने त्या स्वतःच बुडू लागल्या.

ही घटना पाहून तेथील रहिवासी नदीम खान नसीम खान (वय २७) यांनीही तत्काळ पाण्यात उडी मारून मदतीचा प्रयत्न केला. त्यांनी दोन्ही लहान मुलांना वाचवण्यात यश मिळवले; परंतु नदीपात्रातील खोल गड्यांमध्ये असलेल्या भौरीच्या पाण्यात अडकून काफिया पिंजारी व नदीम खान यांना बाहेर येता आले नाही. दुर्दैवाने या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्व. बापूजी युवा फाउंडेशनची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तसेच भडगाव शहर तलाठी अविनाश जंजाळे, टोणगाव तलाठी प्रशांत कुंभारे, रितेश महाजन, पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांच्यासह पोलीस कर्मचारी, नगरपरिषदेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान नगराध्यक्षा रेखा मालचे, भडगाव-पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील, नगरसेवक तसेच मोठ्या संख्येने नागरिक व मृतांचे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित होते. दोन्ही मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. पंकज जाधव यांनी तपासणी करून मृत घोषित केले. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

दोन निष्पाप जीव वाचवण्याच्या प्रयत्नात युवक व महिलेचा मृत्यू झाल्याने संपूर्ण भडगाव शहरात हळहळ व्यक्त होत असून परिसरात दुःखाचे वातावरण पसरले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: जिल्हा जळगावदोन मृत्यूनातेवाईकांचा आक्रोशपाण्यात बुडून मृत्यूभडगाव
Previous Post

क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे प्रॉपर्टी एक्स्पोचे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शानदार उद्धाटन!.

Next Post

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

गोविंदाच्या थरांनी सागर पार्क दणाणणार !

September 5, 2026
युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

युवतींच्या दहीहंडीचा आज शिवतीर्थावर थरार

September 5, 2026
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा कवच!

September 3, 2026
जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

जामठीत शिक्षकाविरोधात संतापाचा उद्रेक; कार पेटवली, पोलिसांवर दगडफेक!

September 3, 2026
भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

भुसावळच्या मविआच्या नगराध्यक्षांचा शिंदे गटात प्रवेश!

September 3, 2026

राखीचा धागा मायेचा; ‘विशेष’ भगिनींना GPS परिवाराने दिला आपुलकीचा आधार

September 2, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif