• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home राजकारण

अखेर महापौर उपमहापौर पदावर शिक्का मोर्तब.

जळगाव महापौरपदी भाजपाच्या दीपमाला काळे तर उपमहापौर पदी शिवसेनेचे मनोज चौधरी निवड निश्चित

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
February 2, 2026
in Uncategorized
अखेर महापालिका महापौर उपमहापौर निवडीवर शिक्कामोर्तब
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव- महानगरपालिका निवडणूकित भाजप – शिवसेना महायुतीने बहुमताचा आकडा पार केला असून.मात्र निवडणुकीनंतर जळगाव शहराच्या राजकारणात महापौर आणि उपमहापौर पदाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर आज महायुतीकडून या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, जळगाव महापालिकेच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

 

या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 46 जागा जिंकत प्रमुख पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले. शिवसेनेला 22 जागा मिळाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा प्राप्त झाली. याशिवाय एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी ठरला असून पाच जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) विजयी झाली आहे.

 

मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर महापौरपदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाले आणि त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपकडून या पदासाठी प्रामुख्याने तीन महिला नगरसेवकांची नावे चर्चेत होती. प्रभाग क्रमांक 12 मधून बिनविरोध निवडून आलेल्या उज्वला बेंडाळे, प्रभाग क्रमांक 7 मधून बिनविरोध निवडून आलेल्या दीपमाला काळे तसेच प्रभाग क्रमांक 13 मधील वैशाली पाटील यांच्यात चुरस निर्माण झाल्याचे चित्र होते.

 

 

मंत्री. गिरीश महाजन यांनी केली महापौर उपमहापौरांची निवड 

दरम्यान, आज महापौरपदासाठी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महायुतीकडून नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार जाहीर केले. त्यानुसार भाजपकडून दीपमाला मनोज काळे यांना महापौरपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. त्या आज महापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असून, बहुमताच्या जोरावर त्यांची निवड बिनविरोध होणे जवळपास निश्चित मानली जात आहे.दुसरीकडे, उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 8 मधून बिनविरोध निवडून आलेले मनोज सुरेश चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीकडे आवश्यक संख्याबळ असल्याने त्यांचीही उपमहापौरपदी बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

भाजप कार्यालय जी एम फाउंडेशन येथे महायुतीच्या आयोजित बैठकीत महापौर उपमहापौर पदाची घोषणा मंत्री गिरीश महाजन,यांनी केली. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, आमदार चंद्रकांत सोनावणे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी,गटनेते प्रकाश बालानी, नितीन लढढा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे आणि महायुतीचे नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

बातमी शेअर करा !
Tags: जळगाव महापालिका महापौर निवड भाजप शिवसेना महायुती जळगाव जळगाव उपमहापौर निवड बिनविरोध दीपमाला काळे महापौर मनोज चौधरी उपमहापौर
Previous Post

जळगावात अजितदादांना सर्वपक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली

Next Post

महापौरपदाच्या उंबरठ्यावरही दीपमाला काळेंचा फिटनेस कायम!

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
महापौरपदाच्या उंबरठ्यावरही दीपमाला काळेंचा फिटनेस कायम!

महापौरपदाच्या उंबरठ्यावरही दीपमाला काळेंचा फिटनेस कायम!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif