• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

कुंटणखान्यावर धाड टाकून अल्पवयीन मुलीची सुटका ! 

खेडी हनुमान नगरात प्रकार : डमी ग्राहक पाठवून रचला सापळा.

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 25, 2026
in Uncategorized
कुंटणखान्यावर धाड टाकून अल्पवयीन मुलीची सुटका ! 
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – सहा महिन्यांपूर्वी भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर मानव तस्करी विरोधी पथक (एएचटीयू) व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत देहविक्रीसाठी डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालविणाऱ्या विजय सखाराम तायडे (वय ३२, रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई दि. २३ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास करण्यात आली. या धाडसी कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, खेडी शिवारातील हनुमान नगर परिसरात विजय तायडे याने भाडेतत्त्वावर एक घर घेतले होते. या घरात तो गेल्या काही महिन्यांपासून एका अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून कुंटणखाना चालवित असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे दि. २३ रोजी मानव तस्करी विरोधी पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.

 

रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास पथकाने डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. डमी ग्राहकाने मिसकॉल दिल्यानंतर तत्काळ कारवाई करत पथकाने संबंधित घरावर छापा टाकला. छाप्यात घरातून अल्पवयीन मुलीसह कुंटणखाना चालविणाऱ्या विजय तायडे याला ताब्यात घेण्यात आले. पीडित मुलीची चौकशी केली असता, संशयित तायडे याने तिला घरात डांबून ठेवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचे तिने सांगितले.

या प्रकरणी कुंटणखाना चालक विजय सखाराम तायडे (रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात पोक्सो कायद्याच्या कलमांची भर घालण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तायडे याच्याविरुद्ध यापूर्वीही कुंटणखाना चालविणे व वेश्या व्यवसाय करवून घेतल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मानव तस्करी विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, संजय हिवरकर, पोहेकॉ नितीन बाविस्कर, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, रविंद्र पाटील, रविंद्र गायकवाड, अनिल पाटील तसेच महिला कर्मचारी निलीमा सुशीर, भुषण कोल्हे, वहिदा तडवी, राहुल वानखेडे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा !
Tags: #breking #JalgaonMIDC #DPlusGrade #UdaySamant #EknathShinde #GulabraoPatil #MahayoutiRoadshow #JalgaonNews #MaharashtraPolitics #IndustrialDevelopment #EmploymentGeneration
Previous Post

बाहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून चांगली बाजारपेठ उपलब्ध 

Next Post

मराठी फॅशन “शो “ने जिंकले जळगावकरांची मने .

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
मराठी फॅशन “शो “ने जिंकले जळगावकरांची मने .

मराठी फॅशन "शो "ने जिंकले जळगावकरांची मने .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif