कोण उधळणार विजयाचा गुलाल ; उत्सुकता शिंगेला
रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी रांगा ; महापालिकेसाठी ५३:५९ टक्के मतदान
जळगाव – जळगाव महापालिकेच्या निवडणुकीचा आज निकाल असून कोण गुलाल उधळणार ही उत्सुकता शिंगेला पोचली आहे.काल सकाळी ७. ३० वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून ते दुपारपर्यंत मतदान केंद्र शुकशुकाट होता. मात्र दुपारनंतर मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मतदान सुरू होते मतदानाची टक्केवारी घसरले असून ५३ पॉईंट ५९ टक्के मतदानाची नोंद झाली. किरकोळ वगळता मात्र मतदान पार पडले. आज निकालासाठी कोण गुलाल उधळणार ही उत्सुकता शिंगेला पोचली आहे. जळगाव नाका एमआयडीसी येथील वखार महामंडळ येथे मतमोजणी सुरू झाली आहे सुरुवातीला टपाली मतदान नाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून निकालासाठी गर्दी झाली






