• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home Uncategorized

लोकांच्या वर्गणीतून माझी उमेदवारी…..

जळगावकरांनी जबाबदारीने मतदान करावे : योगेश हिवरकर” उमेदवार प्रभाक क्र २ (ड)

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
January 11, 2026
in Uncategorized, जळगाव, महापालिका रणसंग्राम
लोकांच्या वर्गणीतून माझी उमेदवारी…..
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

 

 

नवराज्य Live न्यूज नेटवर्क

जळगाव – महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ साठी मतदानाची प्रक्रिया लवकरच पार पडणार असून, या पार्श्वभूमीवर जळगावकरांनी सजग, विचारपूर्वक आणि जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन प्रभाग क्रमांक २ (ड) मधील आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार योगेश दत्तात्रय हिवरकर यांनी केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव शहरातील मूलभूत प्रश्न प्रलंबित असून, रस्त्यांची दुरवस्था, अनियमित पाणीपुरवठा, कचऱ्याचे ढीग, अपुरी स्ट्रीट लाईट व्यवस्था, महिला व बालसुरक्षेचा प्रश्न यामुळे नागरिक त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत केवळ आश्वासनांवर नव्हे, तर प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रतिनिधीची निवड करण्याची वेळ आली आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

योगेश हिवरकर हे गेल्या १५ वर्षांपासून कोणत्याही पदाशिवाय जळगाव शहरातील विविध समस्यांवर सातत्याने काम करत आहेत. प्रशासनाशी पत्रव्यवहार, आंदोलने, जनजागृती, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रश्न मांडून अनेक ठिकाणी ठोस उपाययोजना त्यांनी करून घेतल्या आहेत. कोरोना काळात गरजू कुटुंबांना मदत, परप्रांतीय मजुरांना मायदेशी पाठविणे, रस्ते, गटारी, स्वच्छता, उद्याने, प्रदूषण नियंत्रण यांसारख्या विषयांवर त्यांनी केलेले काम नागरिकांच्या लक्षात आहे.

 

विशेष बाब म्हणजे, योगेश हिवरकर हे लोकवर्गणीतून उभे राहिलेले उमेदवार आहेत. कोणत्याही मोठ्या आर्थिक पाठबळाशिवाय, सर्वसामान्य नागरिकांनी ५०, १०० रुपयांच्या छोट्या योगदानातून त्यांची निवडणूक लढवण्यासाठी आतापर्यंत सुमारे ६० ते ७० हजार रुपये वर्गणी स्वरूपात जमा केली आहे. ही बाब नागरिकांचा त्यांच्यावरील विश्वास आणि स्वच्छ राजकारणाला मिळणारे समर्थन दर्शवते.

मतदानाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “मतदान हे केवळ एक बटन दाबण्यापुरते मर्यादित नसून ते आपल्या कुटुंबाच्या, मुलांच्या आणि शहराच्या भविष्यासाठी घेतलेला निर्णय आहे. क्षणिक प्रलोभन, अमिष किंवा पैशांच्या बदल्यात दिलेले मत उद्या आपल्या प्रश्नांसाठी उभे राहणार नाही.”ते पुढे म्हणाले की, “मी स्वतःला नेता नव्हे, तर जनतेचा सेवक मानतो. माझ्याकडे मोठे पैसे नसतील, पण नागरिकांचे दुःख समजून घेणारे हृदय आणि प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छाशक्ती आहे. एक संधी दिल्यास प्रभाग क्रमांक २ (ड) हा आदर्श विकासाचा नमुना करून दाखवेन.”

या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा आणि स्वच्छ, सुरक्षित व विकासाभिमुख जळगावसाठी योग्य उमेदवाराची निवड करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रभाग क्रमांक २ (ड) मधील मतदारांनी “झाडू” या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून स्वच्छ राजकारणाला बळ द्यावे, असेही आवर्जून सांगण्यात आले आहे.

बातमी शेअर करा !
Tags: #brekingnews #jalgaonbreking #Jalgaonmuncipalelection
Previous Post

प्रभाग १३ मध्ये महायुतीचीच चर्चा….

Next Post

प्रभाग क्र. १६ मध्ये पुस्तक आणि ट्रकची जोरदार चर्चा ….

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
प्रभाग क्र. १६ मध्ये पुस्तक आणि ट्रकची जोरदार चर्चा ….

प्रभाग क्र. १६ मध्ये पुस्तक आणि ट्रकची जोरदार चर्चा ....

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

बीएलओंचा आढावा घेणे तुमचे काम नाही!

July 22, 2026
४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

४०० पोलिसांची मध्यरात्री धाड; ‘ऑपरेशन कॉम्बिंग’मध्ये अवैध शस्त्रनिर्मितीचे जाळे उद्ध्वस्त!

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार!

July 21, 2026

केंद्रीय राज्य क्रीडा मंत्र्यांच्या जिल्ह्यात खेळाडूंवर अन्याय 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा

July 20, 2026
हातात माती… मनात निसर्ग!            सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

July 20, 2026
ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे  अरविंद लाठी कालवश!

ईस्ट खान्देश एज्युकेशन संस्थेचे अरविंद लाठी कालवश!

July 19, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif