• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
NAVARAJYA LIVE NEWS
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना
No Result
View All Result
NAVARAJYA LIVE NEWS
No Result
View All Result
Home अपघात

मोबाईलमध्ये रील बनवितांना दोन युवकांचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील पाळधी येथी घटना; ग्रामस्थांची घटनास्थळी धाव  

योगेश सुने, चीफ एडिटर by योगेश सुने, चीफ एडिटर
October 26, 2025
in अपघात, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
मोबाईलमध्ये रील बनवितांना दोन युवकांचा मृत्यू
Share on FacebookShare on Twitter
बातमी शेअर करा !

नवराज्य डिजिटल न्यूज नेटवर्क

जळगाव (प्रतिनिधी) – मोबाईलवर व्हिडिओ (रील) बनवण्याचा मोह दोन मित्रांसाठी जीवघेणा ठरल्याची अत्यंत दुर्दैवी घटना रविवारी दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ घडली आहे. धावत्या रेल्वेसमोर धोकादायक पद्धतीने रील शूट करत असताना अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसने धडक दिल्याने या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.

या भीषण अपघातात मयत झालेल्या तरुणांची नावे प्रशांत पवन खैरनार (वय १८ वर्षे) आणि हर्षवर्धन महेंद्र नन्नवरे (वय १८ वर्षे) अशी आहेत. दोघेही पाळधी येथील महात्मा फुले नगर, प्लॉट भाग (रेल्वे गेट जवळील प्लॉट) येथील रहिवासी होते. दोन्ही तरुण पाळधी चांदसर रेल्वे गेटजवळ रेल्वे ट्रॅकवर मोबाईलवरील लोकप्रिय अॅपसाठी व्हिडिओ (रील) तयार करत होते.

यावेळी धरणगावकडून जळगावकडे जाणाऱ्या अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेस गाडीची त्यांना धडक बसली.

हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या निष्काळजीपणामुळे व साहसी कृत्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

 

 मा.जि प सदस्य प्रतापराव पाटलांसह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल.

या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. पोलिसांनी पंचनामा करण्याची प्रक्रिया

घेतली. पोलिसांनी पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे हलवण्यात आले. घटनेची पाळधी दुरक्षेत्र पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

बातमी शेअर करा !
Previous Post

राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवनगौरव पुरस्कार रमेश कदम यांना जाहीर

Next Post

औट्रम घाटात ५.५० किमी लांबीचा बोगदा होणार

योगेश सुने, चीफ एडिटर

योगेश सुने, चीफ एडिटर

वृत्तपत्र क्षेत्रात गेल्या 15 वर्षांपासून कार्यरत आहे. दैनिक देशोन्नतीमध्ये जाहिरात, वितरण, संपादकीय व प्रशासन यांसह वृत्तपत्राच्या संपूर्ण कामकाजाचा अनुभव मला मिळाला. तसेच 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील नवभारत हे वृत्तपत्र जॉईन केले. त्यावेळी राज्यात नव्याने सुरू झालेल्या मराठी वृत्तपत्र नवराष्ट्र जनसामान्यांन पर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो. बदलत्या काळासोबत बदल करणे हा नैसर्गिक नियम आहे. आता डिजिटल युगात पदार्पण करत आहोत. या युगात निपक्ष, निर्भीड अशा बातमीदारीची डिजिटल माध्यमाची खरी गरज आहे. हे लक्षात घेता, आता डिजिटल माध्यमात प्रवेश करीत आहोत. ‘नवराज्य Live’ हे डिजिटल न्यूज नेटवर्क राज्यस्तरावर सुरु करत आहोत.

Next Post
औट्रम घाटात ५.५० किमी लांबीचा बोगदा होणार

औट्रम घाटात ५.५० किमी लांबीचा बोगदा होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम

April 17, 2026
ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

ना कजरे की धार..गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

डिजिटल युगात महिलांनी सुरक्षित रहावे –महापौर दीपमाला काळे

April 17, 2026
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल CBSE दहावीचा 100% निकाल; शौर्य काबरा 95.5% गुणांसह प्रथम

April 17, 2026
Load More
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

No Result
View All Result
  • HOME
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • आध्यत्मिक
    • आरोग्य
    • कृषी
    • क्रीडा
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
    • सरकारी योजना

© 2025 NAVARAJY LIVE NEWS

whatsapp-Gif